भुसावळात पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र चौधरींचा कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश


In Bhusawal, former Panchayat Samiti Chairman Rajendra Chaudhary joins the Shiv Sena (Shinde Faction) along with his supporters. भुसावळ (19 मे 2026) : भुसावळ पंचायत समितीचे माजी सभापती व भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी राजेंद्र चौधरी यांनी आपल्या समर्थकांसह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सोमवार, 18 रोजी प्रवेश केला.

वैचारीक मतभेदानंतर दिला होता राजीनामा
भुसावळ तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळणार्‍या अन्यायकारक वागणुकीच्या कारणामुळे त्यांचे लोकप्रतिनिधींशी वैचारिक मतभेद झाल्याने राजेंद्र चौधरी यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, आपल्या राज्यव्यापी शिवसंवाद दौर्‍याची सुरुवात सुरुवात सोमवारी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून केली. सोमवारी शिवसेनेचे नेते खासदार श्रीकांत शिंदे व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात नाशिकच्या एक्सप्रेस इन हॉटेलच्या सभागृहात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत प्रवेश सोहळा झाला. कहॉटेल एक्सप्रेस इनमध्ये झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत आमदार मनीषा कायंदे, जळगावचे माजी खासदार उन्मेश पाटील उपस्थित होते.




यांनीदेखील केला प्रवेश
भुसावळातील प्रा.डॉ.जतीन मेढे, भुसावळ शेतकी संघाचे संचालक प्रकाश चौधरी (वरणगाव), सुनसगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक व जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे संचालक जे.पी.सपकाळे, टहाकळीचे माजी उपसरपंच शांताराम चौधरी, अंजनसोंडे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच धनराज पाटील, राष्ट्रवादीचे रावेर पूर्वचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस आणि पत्रकार संघरत्न सपकाळे , अल्पसंख्यांक आघाडीचे बाबूलाल भाई, राष्ट्रवादी पक्षाचे सामाजिक न्याय पक्षाचे युवा कार्यकर्ते भूपेंद्र तायडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या याप्रसंगी राज्याचे मंत्री उदय सामंत, नामदार दादा भुसे, माजी खासदार उमेश पाटील आदी उपस्थित होते. पुढील काळात रावेर लोकसभा मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे याप्रसंगी राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.

लवकरच भव्य प्रवेश सोहळा
पुढील कालखंडात रावेर लोकसभा क्षेत्रातील विविध पक्षातील महत्त्वाच्या पदाधिकार्‍यांचा शिवसेनेत प्रवेश सोहळा होणार असल्याचे संकेत याप्रसंगी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी दिला. माजी सभापती राजेंद्र चौधरींच्या शिवसेना प्रवेशामुळे भुसावळ तालुका आणि रावेर लोकसभा क्षेत्रातील राजकीय चित्र बदलेल, अशी आशा खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !