भोंदू खरात प्रकरण : स्लीप न भरताच कॅशियरने खात्यात भरली लाखोंची रोकड


The ‘Bhondoo Kharat’ Scandal : Cashier Deposits Lakhs in Cash into Account Without a Deposit Slip मुंबई (20 मे 2026) : महिला लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरीच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या अडचणी सातत्याने वाढतच आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ने मंगळवारी त्याचा सकाळी 11 वाजेच्या सुमारास ताबा घेत नाशिकहून मुंबईकडे बंदोबस्तात रवाना केले. आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर अशोक खरातला विचारणा केली असता ईडी विरोधात कोणतीही तक्रार नसल्याचे खरातकडून कोर्टात सांगण्यात आले तर ईडीने तपासादरम्यान काही मुद्देही मांडल्यानंतर सहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.

स्लिप न भरता कॅशियरच्या मदतीने थेट रोकड खात्यांमध्ये जमा
समता नागरी क्रेडिट सोसायटीमध्ये त्याने अनेकांच्या नावाने तब्बल 63 खाती उघडली, पण त्याला नंबर खरातचा जोडला होता, नॉमिनी अशोक खरात होता, त्यांचा लाभार्थी देखील अशोक खरात होता. पैशाचं लेअरिंग करण्यासाठी या खात्यांचा वापर करण्यात आला. कोट्यवधी रूपये बँकांमध्ये रोकडमध्ये भरण्यात आली आणि रोकडच काढली गेली, एवढे पैसे कुठून आले आणि ते कुठे गेले. अंतिम लाभार्थ्यांपर्यंत आम्हाला पोहोचायचे आहे. यात इतर कोण कोण गुंतले आहेत, या सगळ्याचा तपास करायचा आहे. कोणतीही डिपॉझिट स्लिप न भरता कॅशियरच्या मदतीने थेट रोकड खात्यांमध्ये जमा करण्यात आली. एका संस्थेचा खरात अध्यक्ष होता.




34 बेनामी एफडी खाती उघडण्यात आली होती. रोकडच्या स्वरूपातच या खात्यांमधून पैसे काढले गेले. 2014-2024 पर्यंत हे सुरू होतं. एफडीचे पैसे खरातकडेच पुन्हा सोपवण्यात आल्याने खरातच मुख्य आरोपी आहे, लोकहित लक्षात घेता पोलीस कोठडी गरजेची आहे, असा युक्तीवाद ईडीकडून करण्यात आला आहे.

खरातच्या पत्नीच्या खात्यात आणि तिच्या नावाने देखील बरीच रोख रक्कम आणि मालमत्ता देण्यात आली आहे. या पाच कोटींच्या व्यतिरीक्त दोन कोटींपेक्षा अधिक बँक खात्यामध्ये आहे. बँक अधिकार्‍यांकडे चौकशी करणे बाकी आहे. लोकहित लक्षात घेता आरोपीची चौकशी करणे गरजेची आहे, त्यासाठी 10 दिवसांच्या कोठडीची मागणी ईडीने केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !