सावदा शहरात पाणीपुरवठा विस्कळीत


सावदा (प्रतिनिधी) : शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. उपसा विहिरीजवळील पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या घटली असून परिणामी शहरातील पाणीपुरवठा काही प्रमाणात विस्कळीत झाला आहे.

नगराध्यक्षांनी केली पाहणी
नगराध्यक्षा रेणुका पाटील, उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती फिरोज खान पठाण, मुख्याधिकारी भूषण वर्मा, नगरसेवक सचिन बर्‍हाटे, नकुल बेंडाळे, पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी मांगलवाडी येथील जॅकवेल परिसरात प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जॅकवेलजवळील पाईप-लाईन जवळ गाळ साचल्याचे निदर्शनास आले त्याची पाहणी करत तो काढण्याचे निर्देश देत गाळ काम सुरू करण्यात आले.




लवकरच होणार पाणीपुरवठा सुरळीत
पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती दुरुस्ती व स्वच्छता कामे तातडीने हाती घेण्यात आली असून कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी संबंधित कर्मचार्‍यांना तातडीच्या सूचना देत लवकरात लवकर परिस्थिती पूर्ववत करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, पुढील 2 ते 3 दिवस पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत होण्यास विलंब होण्याची शक्यता असून नागरिकांनी संयम बाळगून पाणी जपून वापरावे, असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !