अल्पवयीनाने विवाहानंतर दिला बाळाला जन्म : पतीसह सासरच्यांविरोधात पोस्कोचा गुन्हा


Minor Gives Birth After Marriage : POCSO Case Registered Against Husband and In-laws भडगाव (25 मे 2026) : भडगाव तालुक्यातील 17 वर्षीय अल्पवयीनाचा विवाह लावल्यानंतर तिच्याशी पतीने ठेवलेल्या संबंधानंतर पीडीता गर्भवती राहून तिने बाळाला जन्म दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पतीसह लग्न लावणार्‍या व सासरच्यांविरोधात पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे प्रकरण
भडगाव तालुक्यातील महिंदळे येथे हा प्रकार घडला. पीडिता 17 वर्षांची असताना संशयित आरोपींनी संगनमत करून तिचा विवाह संशयिताशी केला. 2025 पासून ते 23 मे 2026 पावेतोच्या कालावधीत, संशयीत पतीने पीडित मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा उठवत तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या सततच्या लैंगिक अत्याचारामुळे अल्पवयीन पीडित मुलगी गर्भवती राहिली व तिने बाळाला जन्म दिला. हा प्रकार समोर आल्यानंतर पारोळा पोलिसांनी शून्य (00/2026) क्रमांकाने गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी कागदपत्रे भडगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग केली.



पारोळा तालुक्यातील संशयीतांविरोधात गुन्हा
या प्रकरणात पोलिसांनी संशयित पती, सासरे, सासू (तिन्ही रा. ता. भडगाव) आणि विवाह जुळवून आणणारे मध्यस्थ मोरे दाम्पत्य (दोन्ही रा. ता. पारोळा) अशा एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी करंकार करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !