धुळ्यात अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रौढाला संपवले : आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात


Man Murdered in Dhule Over Suspicion of Illicit Relationship : Accused Nabbed by Crime Branch धुळे (25 मे 2026) : आईसोबत प्रौढाचे संबंध असल्याच्या संशयातून मुलाने प्रौढाला चाकूचे वार करीत संपवल्याची धक्कादायक घटना धुळ्यातील मोहाडी पोलिस ठाणे हद्दीत सोमवारी पहाटे घडली होती. खुनानंतर संशयीत पसार झाला होता मात्र गुन्हे शाखेने आठ तासांच्या आत त्याच्या मुसक्या बांधल्या. किशोर वसंत धापटे (निंबा नगर, अवधान, ता.धुळे) असे खून झालेल्या संशयीताचे तर दिनेश प्रदीप वेंदे (19, निंबा नगर, अवधान, ता.धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

नेमके असे आहे प्रकरण
गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, 24 मे 2026 रोजी रात्री 9.30 ते 25 मे रोजी पहाटे 3 वाजेदरम्यान ही घटना घडली. आरोपी दिनेश प्रदीप वेंदे (वय 19, रा. निंबा नगर, अवधान, धुळे) याने त्याच्या आईचे मयत किशोर वसंत धापटे यांच्याशी कथित अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून रागाच्या भरात धारदार चाकूने वार करून त्यांचा खून केला. घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाला होता. या प्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.



आठ तासांच्या आत आरोपी जाळ्यात
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक माहिती व गोपनीय सूत्रांच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत अखेर त्याला मुडावद, ता.शिंदखेडा येथील जंगलातून अटक करण्यात आली. आरोपीला मोहाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार, मोहाडी निरीक्षक शिल्पा पाटील, उपनिरीक्षक अमित माळी, पोलीस उपनिरीक्षक नितीन करंडे, गे्रडेड उपनिरीक्षक शाम निकम, पोलीस अंमलदार दिनेश परदेशी, तुषार सुर्यवंशी, पंकज खैरमोडे, संदीप कदम व मयुर थोरात आदींच्या पथकाने केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !