फैजपूर पोलिसांनी रोखली गुरांसह गोवंशाची वाहतूक : पाच संशयीतांविरोधात गुन्हा


Faizpur Police Intercept Transport of Cattle and Bovine Stock: Case Registered Against Five Suspects यावल (26 मे 2026) : यावल तालुक्यातील पिंपरूड फाट्यापासून आमोदा जाणार्‍या रोडवर गोवंश व म्हशी घेवून जाणारी दोन वाहने फैजपूर पोलिसांनी पकडली. एकूण आठ लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. न्हावी गावापासून फैजपूरकडे जाणार्‍या रस्त्यावर एक संशयीत पायी पाच गोवंश नेत असताना पकडण्यात आला. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले.

काय आहे प्रकरण ?
फैजपूर ते भुसावळ रस्त्यावर पिंपरूड फाट्याकडून आमोदा गावाकडे जाणार्‍या रस्त्यावरून बुलेरो पिकअप वाहन (क्रमांक एम. एच. 19 सी.एक्स. 2147) त्याचप्रमाणे दुसरे पुन्हा एक बोलेरो पिकअप वाहन (क्रमांक एम. एच. 19 सी. एक्स. 0487) या दोघांमध्ये तब्बल 14 म्हशी आणि एक पारडूची अवैधरित्या वाहतूक केली जात होती. याची माहिती फैजपूर पोलिसांना मिळाल्यानंतर पथकाने दोन्ही वाहन आणि त्यातील प्राणी म्हशी असा एकूण आठ लाख 80 हजारांचा मुद्देमाल पकडला. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात कुलदीप पवार यांच्या फिर्यादीवरून सलमान इसाक शेख, शेख मुस्तकीम शेख अब्दुल्ला (रा.अख्तर नगर, वरणगाव), शेख इरफान शेख बिस्मिल्ला (रा.बडा आखाडा, सावदा) व आवेश खान एजाज खान (रा. ख्वाजा नगर सावदा) या चार जणांविरुद्ध प्राणी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला. तपास पोलीस उपनिरीक्षक मयानोद्दीन सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संजय झाल्टे करीत आहे.

न्हावीजवळ गोवंश पकडले
न्हावी ता. यावल या गावाकडून फैजपूर जाणार्‍या रस्त्यावर रात्रीच्या अंधारात आमीन रुबाब तडवी (रा.तळेगाव, न्हावी) हा पाच गोवंश, बैल पायी नेत होता. चोरट्या मार्गाने तो जनावरे नेत असल्याची माहिती फैजपूर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी एक लाख पाच हजारांचे गोवंशाची सुटका केली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात देवेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सुपडा पाटील करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !