यावल बसस्थानकातून प्रवासी महिलेकडील दागिण्यांसह रोकड लांबवली


Cash and jewelry stolen from a female passenger at Yawal Bus Stand यावल (26 मे 2026) : यावल शहरातील बस स्थानकात प्रवासासाठी आलेल्या एका दाम्पत्याजवळील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरट्याने लांबवले. चोरीची घटना रविवारी घडली. या प्रकरणी यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 65 हजारांचा मुद्देमाल बस स्थानकावर प्रवासासाठी आलेल्या या दाम्पत्याजवळून लांबवण्यात आला.

65 हजारांचा ऐवज लंपास
यावल शहरातील बसस्थानकात असलेल्या कंट्रोल कॅबिनच्या जवळ प्रवासासाठी हाफिज खान अब्बास खान (49), त्यांची पत्नी फरजाना बी व मुलगी सदफ परवीन (तहा नगर, फैजपूर) हे प्रवासासाठी आले होते. कंट्रोल कॅबीनच्या शेजारी ते बसलेले असतांना अज्ञात चोरट्याने त्याच्या पत्नीच्या पर्समध्ये असलेला सोन्याचा हार, पाच हजारांची रोकड मिळून 65 हजारांचा मुद्देमाल लांबवला. हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !