विधान परिषद निवडणूक : 12 जागांसाठी 48 जणांची नावे ; प्रदेशाध्यक्ष अमित शहांच्या भेटीला


Legislative Council Election : 48 Names Proposed for 12 Seats; Delegation to Meet State President Amit Shah मुंबई (26 मे 2026) : राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी एकीकडे चुरस वाढत असतानाच दुसरीकडे उमेदवारी अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना याही निवडणुकीत होत आहे. महायुतीमध्ये 12-5-2 असा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा असून भाजप 12, शिंदेंची शिवसेना 5 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा देण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, भाजपने 12 जागांसाठी तयारी सुरू केली असून उमेदवारांच्या नावांची यादीही निश्चिती केली असून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंगळवारी 48 नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना होत आहेत.

दोन दिवसांत नावे जाहीर होणार
विधानपरिषद निवडणुकांचा महायुतीमधील फॉर्म्युला, भाजपच्या उमेदवारांची नावे व इतर बाबींची तपशीलवार माहिती केंद्रीय पक्ष नेतृत्वाला दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, चव्हाण यांच्या दिल्ली दौर्‍यातच भाजपच्या 12 उमेदवारांची नावे निश्चित केली जातील व आगामी दोन ते तीन दिवसांत भाजप उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 1 जून पर्यंतची मुदत असल्याने उमेदवारांना तयारीला लागण्याचे आदेशही पक्षाकडून दिले जातील.

विधानपरिषदेच्या प्रश्नावर एकनाथ शिंदेंचा संताप
विधानपरिषद निवडणुकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांशी एकनाथ शिंदेंची अनेकदा चर्चा झाली. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांनी दिल्ली वारी करूनही विधान परिषदेच्या निवडणुकीवर तोडगा निघत नसल्याने एकनाथ शिंदे हे पत्रकारांच्या प्रश्नावर भडकल्याचं दिसून आले. विधान परिषदेच्या जागांवर पत्रकारांनी प्रश्न विचारताच, एकनाथ शिंदे चांगलेच संतापले. कुठलं बोलणार… काय आहे? असं म्हणत त्यांचा संताप अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !