शेतकर्‍यांच्या हक्काच्या विजेवर घाला घालू नका : अन्यथा तीव्र आंदोलन उभारू

काँग्रेसचे युवा जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरींचा इशारा


यावल (28 मे 2026) : शेतकर्‍यांच्या हक्काच्या विजेवर घाला घातल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी (पूर्व) नूतन अध्यक्ष धनंजय चौधरी यांनी दिला आहे. यावल-रावेर तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात वीज कंपनीमार्फत रात्रीच्या वेळेस जंगल फिडरवरील वीजपुरवठ्यामध्ये दोन तासांची कपात करण्यात आली. यापूर्वी शेतकर्‍यांना आठ तास वीजपुरवठा होत होता मात्र वाढत्या उन्हामुळे विजेचा वापर वाढल्याचे कारण देत आता ही कपात करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

केळी बागांची कापणी सुरू
सध्या संपूर्ण जळगाव जिल्ह्यात विशेषतः रावेर, यावल, चोपडा आणि मुक्ताईनगर तालुक्यातील केळी पट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केळी बागांची कापणी सुरू आहे. नवीन लागवडीचे कामही याच कालावधीत मोठ्या प्रमाणावर सुरू असून अशा परिस्थितीत शेतीसाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे शिवाय वीजपुरवठा सुरळीत आवश्यक आहे. रात्रीच्या वीजपुरवठ्यात कपात करणे म्हणजे हा एक प्रकारे शेतकर्‍यांवर मोठा अन्याय आहे.

तर तीव्र स्वरुपाचे आंदोलन
आधीच पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, रासायनिक खतांची महागाई आणि उत्पादन खर्चामुळे तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाल्याने आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच आता शेतीसाठी लागणारा वीजपुरवठा कमी होत असेल तर शेतकर्‍यांचे कंबरडे मोडल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त करत जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी (पूर्व) अध्यक्ष धनंजय चौधरी यांनी शासन आणि वीज वितरण कंपनीला/प्रशासनाला इशारा दिला आहे की, तत्काळ वीजपुरवठ्याची वीजपुरवठ्याची कपात मागे घेऊन पूर्ववत नियमित आठ तास वीजपुरवठा सुरू करावा अन्यथा जिल्ह्यात ठिकठिकाणी लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !