रावेर तालुका हादरला : नराधम मावसाचा अल्पवयीनावर अत्याचार


Raver Taluka Shaken: Depraved Maternal Uncle Abuses Minor रावेर (31 मे 2026) : नातेसंबंधाला काळीमा फासणारी संतापजनक घटना रावेर तालुक्यातून समोर आली आहे. नराधम मावसाने अल्पवयीन मुलीवर तब्बल सात महिने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. नराधमाविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

असे आहे प्रकरण
रावेर तालुक्यातील एका गावात मावसाकडे राहण्यासाठी आलेल्या पीडीतेवर 47 वर्षीय मावसाने 12 नोव्हेंबर 2025 ते 29 मे 2026 या कालावधीत सातत्याने अत्याचार केला. अत्याचाराची ही बाब कुणाला सांगितल्यास आरोपीने पीडीतेला ठार मारण्याी धमकी दिली मात्र त्रास असह्य झाल्याने 17 वर्ष व तीन महिने वयाच्या पीडीतेने तक्रार दिल्यानंतर संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

तपास सावदा सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक राहुल सानप करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !