वरणगाव पोलिसांची कामगिरी : स्थानिक संशयीताकडून गावठी कट्टा जप्त
Varangaon Police Achievement : Country-made Pistol Seized from Local Suspect वरणगाव (31 मे 2026) : दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने कट्टा बाळगणार्या गावातील संशयीताला वरणगाव पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील आंबेडकर नगरात ही कारवाई 30 रोजी सायंकाळी 6.10 वाजेच्या सुमारास करण्यात आली. आदर्श ज्ञानेश्वर भैसे (22, आंबेडकर नगर, वरणगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
वरणगावचे सहाय्यक निरीक्षक अमित बागुल व सहकार्यांनी शहरातील संशयीत दहशतीच्या उद्देशाने कट्टा बाळगून असल्याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी सायंकाळी पथकाने संशयीत आदर्श भैसे यास ताब्यात घेतले व त्याच्याकडून 15 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त केला. संशयीताविरोधात कॉन्स्टेबल फिरोज खान आसीफ खान पठाण (42) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय नागेंद्र तायडे करीत आहेत.
