एनआयए अधिकारी अपघातात ठार : गर्लफ्रेंड जखमी


नवी दिल्ली (31 मे 2026) : उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात एनआयएचे डेप्युटी एसपी ईशान मेहरा यांचा मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत दुचाकीवर बसलेली त्यांची मैत्रिण गंभीर जखमी झाली. तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ईशान मेहरा हे दिल्ली येथील एनआयएच्या मुख्यालयात तैनात होते. रात्री उशिरा ते दिल्लीमधून बाजपूरच्या दिशेने जात होते. यादरम्यान, मुरादाबाद येथील कटघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांची दुचाकी समोरून जाणार्‍या कंटेनरला मागून धडकली. ही टक्कर एवढी जोरदार होती की त्यात ईशान मेहरा याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची मैत्रिण गंभीर जखमी झाली.

अपघातानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जखमी महिलेला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आली. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !