भुसावळात भरदिवसा मुख्याध्यापकाचे घर फोडले : 15 लाखांचे दागिने लंपास


Principal’s House Burglarized in Broad Daylight in Bhusawal : Jewelry Worth ₹15 Lakh Stolen भुसावळ (1 जून 2026) : शहरातील मुख्याध्यापकाचे भरदिवसा असलेले बंद घर पाहून चोरट्यांनी दोन तासात काम फत्ते करीत सुमारे 15 लाख रुपये किंमतीचे 10 तोळे सोने लंपास केले. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. वाढत्या चोर्‍या-घरफोड्यांनी नागरिक धास्तावले असून पोलिसांच्या संथ गतीने सुरू असलेल्या तपासानेही आश्चर्य व्यक्त होत आहे.

काय घडले शहरात ?
भुसावळ शहरातील मिरची ग्राऊंड परिसरातील हुडको कॉलनी भागात महाराणा प्रताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश शिंदे वास्तव्याला आहे. परिवार बाहेरगावी गेल्याने शिंदे हे घरी एकटेच होते. रविवार, 31 मे रोजी 16 ते 1.30 दरम्यान ते कटींग-दाढीसाठी बाहेर पडल्यानंतर गेट व मुख्य दरवाजाला कुलूप लावण्यात आले मात्र चोरट्यांनी वर्दळ नसलेल्या परिसरात संधी संधी साधली.

दुपारी दीड वाजता मुख्याध्यापक घरी परतल्यावर घरफोडीचा प्रकार समोर आला. भरदिवसा झालेल्या घरफोडीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे हवालदार विजय नेरकर, चंद्रकांत रायपूरकर, दिलीप कोल्हे, जावेद शहा आदींनी भेट देत पाहणी केली तर सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !