फेकरीतील पत्रकार राजेश निकम यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षण भूषण पुरस्काराने’ गौरव

शिक्षक आमदार सत्यजीत तांबे यांची उपस्थिती : 67 मान्यवरांचा पुरस्काराने गौरव


Journalist Rajesh Nikam of Fekari Honored with the ‘State-Level Ideal Education Excellence Award’ भुसावळ (1 जून 2026) : प्रादेशिक शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्यतर्फे आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षण भूषण पुरस्कार, आदर्श रत्न व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात रविवार, 31 रोजी मोठ्या थाटात पार पडला. या सोहळ्यात भुसावळ तालुक्यातील फेकरीतील पत्रकार राजेश निकम यांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षण भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

67 मान्यवरांचा सन्मान
पुरस्कार सोहळ्यात राज्यभरातील 67 मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला. भुसावळ तालुक्यातील पत्रकार राजेश निकम, तंत्रज्ञ स्वप्निल पाटील, किशोर सपकाळे, शारदा शिक्षण मंडळ, दीपनगरचे माध्यमिक शालेय प्रमुख उन्मेष पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षण भूषण पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.

शारदा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय दीपनगरातील प्रा.जी.व्ही.तायडे, मनीषा भास्करराव पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आला. या भव्य सोहळ्यात आमदार सत्यजीत तांबे, रीजनल टीचर्स ऑरगॅनायजेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संजय काशीद, राज्य सल्लागार प्रदीप सोनवणे, युवा सेनेचे विभागीय सचिव विराज कावडीया, एच.जी.इंगळे, राज्य कार्याध्यक्ष गोविंदा पाटील, वसंत शिर्के, रणजित सोनवणे उपस्थित होते.

प्रास्ताविक प्रदीप सोनावणे यांनी केले व अहिल्याबाई होळकर यांची जयंती निमित्ताने मनिषा पाटील यांनी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली.

हे तर समाज परिवर्तनाचे शिल्पकार
आमदार सत्यजित तांबे यांनी शिक्षक, समाजसेवक, डॉक्टर पत्रकार, वकील हे समाज परिवर्तनाचे खरे शिल्पकार असल्याचे सांगितले.

राष्ट्रीय अध्यक्ष आमदार संजय काशीद यांनी शिक्षकांना सरकारने मोकळा श्वास घेऊ द्यावा व शिक्षकांना महत्त्वाचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न सरकार दरबारी प्रयत्न करावा, अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले.

पुरस्कारानंतर शुभेच्छांचा वर्षाव
फेकरी परिसरातील सर्वांना मिळालेल्या राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार मुळे फेकरीची राज्यस्तरीय पातळीवर ओळख निर्माण झाली त्यामुळे आजच्या युवकांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.हा कार्यक्रम यशस्वी रित्या पूर्ण करण्यासाठी प्रादेशिक शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्ह्यातील सर्व जिल्हा पदाधिकारी व तालुकाध्यक्ष यांनी सहकार्य केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !