रेल्वे प्रवाशांसाठी बातमी महत्त्वाची : नागपूर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोन बंदने दोन गाड्या शॉर्ट टर्मिनेट


भुसावळ (1 जून 2026) : नागपूर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 बंद असल्यामुळे कोचिंग परिचालनावरील परिणामांचा कालावधी 52 दिवसांवरून वाढवून 61 दिवस करण्यात आला आहे. त्यानुसार पूर्वी लागू करण्यात आलेली व्यवस्था 30 मे 2026 ते 07 जून 2026 या कालावधीसाठी अतिरिक्त 9 दिवसांनी वाढविण्यात आली आहे.

दोन गाड्या शॉर्ट टर्मिनेट
गाडी क्रमांक 11203 नागपूर-मडगाव एक्सप्रेस 30 मे 2026 ते 06 जून 2026 या कालावधीत ही गाडी नागपूर स्थानकाऐवजी अजनी स्थानकावरून नियोजित वेळेनुसार सुटेल.

गाडी क्रमांक 11204 मडगाव-नागपूर एक्सप्रेस 31 मे 2026 ते 7 जून 2026 या कालावधीत ही गाडी अजनी स्थानकापर्यंतच चालविण्यात येईल व नागपूर स्थानकापर्यंत जाणार नाही.

प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी संबंधित गाड्यांची अद्ययावत स्थिती व वेळापत्रकाची माहिती अवश्य तपासून घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !