गोंदिया एसीबीच्या पोलीस उपअधीक्षकपदी निलेश लोधी


Nilesh Lodhi Appointed as Deputy Superintendent of Police, Gondia ACB गोंदिया (2 जून 2026) : गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक विलास काळे यांची पदोन्नतीवर भंडारा पोलीस उपअधीक्षकपदी बदली झाल्यानंतर रिक्त जागेवर निलेश सुरेश लोधी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोधी यांनी यापूर्वी जळगाव जिल्ह्यातील एसीबीला निरीक्षकपदी कामकाज केले आहे शिवाय अलीकडे ते बुलढाणा जिल्ह्यातही कार्यरत होते.

लाच मागितल्यास करा तक्रार
पदभार स्वीकारल्यानंतर लोधी म्हणाले की, भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यासाठी एसीबीचा विभाग कटीबद्ध आहे. गोंदिया जिल्हा भ्रष्टाचार मुक्त होण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे व लाच मागितल्यास कुठलीही भीती न बाळगता पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

लाच देणे व घेणे गुन्हाच
कोणत्याही शासकीय कार्यालयात लाचेची मागणी केली जात असल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा व तक्रारदार यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल. लाच देउ नका व लाच घेउ नका आणि लाच मागितल्यावर तक्रार करा हा संदेश समाजात रुजवीण्यासाठी सर्व नागरीकांनी पुढाकार घ्यावा. भ्रष्टाचारमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी सहकार्य करावे, असेही उपअधीक्षक लोधी म्हणाले.

लाचखोरांची येथे करा तक्रार
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय,
गोंदिया तिरोडा रिंग रोड, रेल्वे चौकीजवळ, गोंदिया
दुरध्वनी क्र. 07182-251203
व्हॉटसअ‍ॅप क्रमांक 9209041064
टोल फ्रि नं. 1064



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !