भुसावळातील राजश्री नेवे यांची पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या शहर सचिवपदी निवड


Rajashree Neve of Bhusawal Appointed as City Secretary of the Environment Conservation and Development Committee भुसावळ (2 जून 2026) : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या भुसावळातील राजश्री उमेश नेवे यांची पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या भुसावळ शहर सचिवपदी निवड करण्यात आली.

पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार डी.के.आरीकर यांच्या आदेशाने व विभागीय अध्यक्ष सुखदेव लक्ष्मण भालेराव (पत्रकार) यांच्या शिफारसीने तसेच उत्तर महाराष्ट्र सचिव, भूगोल अभ्यासक व संशोधक प्रा.योगेश दिनकर गोसावी व जळगाव जिल्हाध्यक्ष देवेंद्र मधुकर वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली एका पत्रान्वये ही निवड करण्यात आली.

राजश्री नेवे या पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, जैवविविधता जतन, तसेच सामाजिक प्रश्नांवर सातत्याने काम करतात. त्यांच्या निवडीमुळे भुसावळ शहरात पर्यावरण संरक्षण व विकासाच्या विविध उपक्रमांना अधिक गती मिळेल, असा विश्वास समितीच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

या निवडीबद्दल विविध सामाजिक, पर्यावरणप्रेमींकडून राजश्री नेवे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भविष्यात पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड, पाणी संवर्धन आणि जनजागृतीसाठी व्यापक उपक्रम राबविण्याचा मानस नेवे यांनी व्यक्त केला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !