निकषात न बसणार्‍या बहिणींना लाडकी बहिण योजनेतून वगळले ! पुरूष लाभार्थींकडून रकमेची वसुली होणार : मुख्यमंत्री


Sisters who do not meet the eligibility criteria have been excluded from the ‘Ladki Bahin’ scheme ; funds will be recovered from male beneficiaries: Chief Minister. मुंबई (2 जून 2026) : राज्यातील लाडकी बहिण योजनेसाठी शासनाचे निकष होते व निकषात बसणार्‍या एक कोटी 70 लाख महिला निकषात बसत असल्याने त्यांना पैसे मिळत राहतील मात्र निकषात न बसणार्‍या बहिणी अपात्र ठरल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. लाडकी बहीण केवायसी करणार असेल तर आम्ही पुन्हा विंडो ओपन करायला तयार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगून ज्या पुरूषांनी या योजनेचा लाभ घेतला त्यांच्याकडून पूर्ण रक्कम वसुल करणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.

80 लाख महिलांना वगळले : विरोधकांचा संताप
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेची पूर्तता न करणे, आवश्यक निकष पूर्ण न होणे आणि अर्जांमधील त्रृटींमुळे राज्यातील तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्या. त्यांना दरमहा मिळणारी 1500 रुपयांची आर्थिक मदत आता बंद झाली आहे. इतक्या मोठ्या संख्येने लाभार्थी महिलांना योजनेतून वगळण्यात आल्याने विरोधकांनी सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहेत.े वाढत्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली.

काय म्हणाले मुख्यमंत्री ?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील कुठल्याही पात्र लाडक्या बहिणीला योजनेतून वगळलेले नाही. डेटा बेसनुसार आणि निकषात न बसणार्‍या ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, तसेच ज्या लाडक्या बहिणी योजनेच्या निकषात बसत नाही आणि ज्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्या 80 लाख लाडक्या बहिणींना यामध्ये वगळण्यात आले आहे.

पुन्हा एकदा केवायसी विंडो ओपन करण्याची सरकारची तयारी
फडणवीस म्हणाले, अलीकडे केलेल्या तपासणीत चार ते पाच लाख लाभार्थी असे निघाले ज्यांच्याकडे चार चाकी गाडी आहे. अजूनही काही महिलांना वाटत असेल की, त्या पात्र असून त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही त्यासाठी पुन्हा एकदा केवायसी विंडो ओपन करण्याची सरकारची तयारी आहे. लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू केली, तेव्हा या योजनेचे निकष होते. उत्पन्नाचे निकष होते. वयाचे निकष होते, शासकीय नोकरी असेल तर योजनेचा फायदा घेता येणार नाही. चारचाकी गाडी असेल तर योजनेत सहभागी होता येणार नाही, असे अनेक निकष होते, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांविषयी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलत असताना बावनकुळे म्हणाले, काही नावे कमी झाली आहेत, याचा अर्थ ती कायमस्वरूपी कमी झाली आहेत, असा अजिबात होत नाही. तांत्रिक अडचणी किंवा कागदपत्रांमधील त्रृटींमुळे काही नावे तात्पुरती बाजूला ठेवली जाऊ शकतात, परंतु सरकार या प्रकरणांची पुन्हा तपासणी करेल. अर्जामध्ये किंवा प्रक्रियेत काही चूक असेल, तर ती नक्कीच दुरुस्त केली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !