विवाहितेशी जवळीक साधत अत्याचार : पाचोरा तालुक्यातील संशयीताविरोधात गुन्हा


Sexual Assault After Establishing Intimacy with Married Woman: Case Registered Against Suspect in Pachora Taluka पाचोरा (3 जून 2026) : विवाहित महिलेसोबत जवळीक साधत वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पाचोरा तालुक्यात घडला आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिसात एका संशयीताविरोधात लात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे प्रकरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या फिर्यादीवरून अनिल प्रकाश महाजन (पाचोरा तालुका) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पीडीत फिर्यादीनुसार, ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीत आरोपीने पीडित महिलेशी जवळीक साधत तिच्यावर प्रेम असल्याचे सांगितले. तू मला खूप आवडतेस, तुझ्या पतीला सोडून माझ्यासोबत ये, असे सांगून आरोपीने महिलेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विविध ठिकाणी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !