रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या : धुळे व पंचवटी एक्स्प्रेस या दिवशी रद्द !

अटगाव स्थानकावर रेल्वेचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक


Attention, Railway Passengers: Dhule and Panchavati Express Cancelled on This Day! भुसावळ (4 जून 2026) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामार्फत अटगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कार्यान्वित करण्यासाठी व जुन्या पॅनेल हटविण्याच्या कामासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे. ब्लॉकमुळे मुंबई-धुळे एक्स्प्रेस तसेच मुंबई-पंचवटी एक्सप्रेस 6 रोजी रद्द करण्यात आली आहे तर अनेक गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहे.

6 व 7 रोजी ब्लॉक
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामार्फत अटगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी तसेच जुन्या पॅनेल विसर्जन करण्यासाठी शनिवार, 6 रोजी व रविवार, 7 रोजी आसनगाव व थानसिट स्थानकांदरम्यान विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे. कालावधी 6 रोजी दुपारी दोन ते 7. जून रोजी पहाटे तीन वाजेपर्यंत असेल. आसनगाव व थानसिट स्थानकांदरम्यान अप व डाउन एनई लाईनवर (दोन्ही स्थानके वगळून) ब्लॉक असेल.

चार रेल्वे गाड्या रद्द
11011 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-धुळे एक्सप्रेस, 11012 धुळे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, 12109 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मनमाड पंचवटी एक्सप्रेस, 12110 मनमाड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पंचवटी एक्सप्रेस 6 जून रोजी रद्द करण्यात आली आहे.

या गाड्या शॉर्ट टर्मिनेट
17611 हजूर साहिब नांदेड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस 5 ून रोजी हजूर साहिब नांदेड येथून स्थानकावरून सुटून मनमाड स्थानक येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. ही गाड़ी मनमाड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान रद्द असेल.

12072 हिंगोली डेक्कन-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्सप्रेस प्रवास 6 रोजी हिंगोली डेक्कन येथून स्थानकावरून सुटून नाशिक रोड स्थानक येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. हीगाड़ी नाशिक रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान रद्द राहील.

17612 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस 6 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटण्याऐवजी मनमाड स्थानकातून आपल्या नियोजित वेळेनुसार सुटेल. ही गाडी मुंबई ते मनमाड दरम्यान रद्द राहील.

12071 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेस 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटण्याऐवजी नाशिक रोड स्थानकातून आपल्या नियोजित वेळेनुसार सुटेल. ही गाडी मुंबई ते नाशिक रोड दरम्यान रद्द असेल.

डाउन दिशेतील पुन: निर्धारित गाड्या
12809 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा मेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 07 जून रोजी 1.20 वाजता सुटेल.

12322 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा मेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 7 रोजी 1.30 वाजता सुटे

11057 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-अमृतसर एक्सप्रेस 7 रोजी दोन वाजता सुटेल

01079 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-गोरखपूर विशेष गाडी 7 रोजी 4 वाजता सुटेल

22177 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-बनारस महानगरी एक्सप्रेस 7 जून रोजी 2.15 वाजता सुटेल

02141 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर विशेष गाडी प्रवास 7 जून रोजी 2.30 वाजता सुटेल

18029 लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार एक्सप्रेस 7 जून रोजी 1.20 वाजता सुटेल

12167 लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस सुपरफास्ट एक्सप्रेस 7 रोजी 1.45 वाजता सुटेल

12141 लोकमान्य टिळक टर्मिनस-पाटलीपुत्र एक्सप्रेस 7 रोजी दोन वाजता सुटेल

12811 लोकमान्य टिळक टर्मिनस-हटिया सुपरफास्ट एक्सप्रेस 7 रोजी 2.15 वाजता सुटेल

22538 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर कुशीनगर सुपरफास्ट एक्सप्रेस 07.06.2026 रोजी 02.30 वाजता सुटेल (नियोजित वेळ 00.35 वाजता).

डाउन दिशेतील वळविण्यात आलेल्या गाड्या
खालील गाड्या प्रवास सुरू दिनांक 6 रोजी कल्याण-कर्जत-पुणे-मनमाड मार्गे चालविण्यात येतील

11071 लोकमान्य टिळक टर्मिनस-बलिया कामायनी एक्सप्रेस
01027 दादर-गोरखपूर विशेष गाडी
15066 पनवेल-गोरखपूर एक्सप्रेस
11001 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-बल्लारशाह एक्सप्रेस
12131 दादर-साईनगर शिर्डी एक्सप्रेस प्रवास सुरू 6 रोजी कल्याण-कर्जत-पुणे-साईनगर शिर्डी मार्गे वळविण्यात येईल.

17057 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-लिंगमपल्ली देवगिरी एक्सप्रेस प्रवास सुरू 6 रोजी कल्याण-कर्जत-पुणे-दौंड-मनमाड मार्गे वळविण्यात येईल

या गाड्या धावणार उशिराने

अप दिशेतील गाड्या 5 रोजी 01026 बलिया-दादर विशेष गाडी कसारा येथे 1 तास 45 मिनिटे नियंत्रित केली जाईल

18030 शालिमार-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस इगतपुरी येथे 50 मिनिटे नियंत्रित केली जाईल

12810 हावडा-मुंबई मेल इगतपुरी येथे 20 मिनिटे नियंत्रित केली जाईल.

20104 भाटनी-लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस भुसावळ विभागात 10 मिनिटे नियंत्रित केली जाईल.

11082 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस भुसावळ विभागात आवश्यकतेनुसार नियंत्रित केली जाईल.

22537 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस कुशीनगर एक्सप्रेस भुसावळ विभागात आवश्यकतेनुसार नियंत्रित केली जाईल.

11062 जयनगर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस भुसावळ विभागात आवश्यकतेनुसार नियंत्रित केली जाईल

01080 गोरखपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी भुसावळ विभागात आवश्यकतेनुसार नियंत्रित केली जाईल.

11203 नागपूर-मडगाव एक्सप्रेस 6 रोजी भुसावळ विभागात 30 मिनिटे नियंत्रित केली जाईल.

प्रवाशांना विनंती करण्यात येते की, नाशिक रोड आणि मनमाड स्थानक येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात आलेल्या गाड्यांमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी मुंबईकडे जाण्यासाठी पर्यायी गाड्यांमध्ये प्रवासाची व्यवस्था करण्यात येईल तसेच ज्या प्रवाशांना आपले तिकीट रद्द करावयाचे असेल त्यांना विशेष आरक्षण खिडकीमार्फत तिकीट परतावा देण्यात येईल




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !