पाच हजारांची लाच घेणारा धुळ्यातील लाचखोर पुरवठा निरीक्षक पोलीस कोठडी
Corrupt Supply Inspector from Dhule, caught accepting a bribe of ₹5,000, placed in police custody धुळे (4 जून 2026) : ज्वारीचा दर्जा चांगला दाखवत मोजणी करण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती पाच हजारांची लाच मागून ती स्वीकारताना धुळे तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक तथा गोदाम व्यवस्थापक मनीष महेश बागुल (30, साईछत्र अपार्टमेंट, आरटीओ कार्यालयाजवळ, पेठ रोड, नाशिक) यास धुळे एसीबीने बुधवार, 3 जून रोजी रंगेहाथ अटक केली होती. बागुल यास गुरुवारी धुळे न्यायालयात हजर केले असता 6 जूनपर्यंत अर्थात दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
असे आहे लाच प्रकरण
या प्रकरणातील तक्रारदार हे धुळे तालुक्यातील अंचाळे गावचे रहिवासी आहेत. त्यांनी शासनाच्या धान्य खरेदी योजनेअंतर्गत सन 2025-26 मध्ये रब्बी हंगामातील ज्वारी धुळ्यातील खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणली होती. धुळे शासकीय गोदामात धान्याची मोजणी केल्यानंतर पावत्या देण्यात आल्या मात्र पुरवठा निरीक्षक तथा गोदाम व्यवस्थापक मनीष बागुल यांनी ज्वारीचा दर्जा चांगला दाखवण्यासह ज्वारी मोजून घेण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर बुधवार, 3 रोजी सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
अधिक तपास धुळे एसीबीचे डॅशिंग पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल व सहकारी करीत आहेत.



