जळगाव पोलिसांनी रोखली एमडी ड्रग्जची तस्करी : त्रिकूटासह सहा लाख 53 हजारांचा मुद्देमाल जप्त
Jalgaon Police Thwart MD Drug Smuggling: Contraband Worth ₹6.53 Lakhs Seized, Trio Arrested जळगाव (4 जून 2026) : जळगाव स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाईत एम.डी.ड्रग्जची तस्करी रोखत तीन संशयीतांना अटक केली व अंमली पदार्थासह एकूण सहा लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
गोपनीय माहितीच्या आधारे गुरुवार, 4 जून रोजी मध्यरात्री राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील सुरेशदादा जैन कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात पोलिसांनी सापळा रचला. यावेळी संशयित मारुती सुझुकी एस-प्रेसो (एम.एच.29 बी.सी. 5100) कारची तपासणी केली असता वाहनात 16.11 ग्रॅम एमडी (मेफोड्रोन) हा अंमली पदार्थ आढळून आला. फॉरेन्सिक तपासणीतही हा पदार्थ एमडी असल्याचे निष्पन्न झाले.
लाखोंचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी आरोपींकडील 16.11 ग्रॅम एमडी (किंमत 48 हजार), तसेचार चार लाखांची कार, 50 व 55 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी तसेच 50 हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल फोन मिळून एकूण सहा लाख 53 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
तीन आरोपींना अटक
पोलीस हवालदार मुरलीधर धनगर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात संशयीत रईस हारुन देशमुख (27, एमआयडीसी पोलीस कॉलनी, जळगाव), तौसीफ सैय्यद आरीफ (21, पिंप्राळा हुडको, जळगाव) व कृणाल उर्फ लकी रमेश पाटील (30, देविदास कॉलनी, जळगाव) यांच्याविरोधात एनडीपीएस अधिनियम 1985 तसेच भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, उपनिरीक्षक शरद बागल, उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, एएसआय अतुल वंजारी, जयंत चौधरी, हवालदार सुनील दामोधरे, अकरम शेख, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, किशोर पाटील, बबन पाटील, यशवंत टहाकळे, सलीम तडवी, रफिक शेख, राहुल रगडे, मयूर निकम, रवींद्र चौधरी, ईश्वर पाटील, राहुल कोळी, गोपाळ पाटील, विलास गायकवाड, प्रदीप सपकाळे, रवींद्र कापडणे, प्रदीप चौरे व एमआयडीसी एपीआय गणेश वाघ आदींच्या पथकाने केली.



