दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड चोरट्यांनी लांबवली ; भुसावळातील कंत्राटदाराला आर्थिक फटका
Thieves make off with ₹1 lakh in cash from two-wheeler storage compartment; contractor from Bhusawal suffers financial loss भुसावळ (5 जून 2026) : कामानिमित्त शहरातील पांडुरंग टॉकीज परिसरात आलेल्या एका कंत्राटदाराच्या दुचाकीच्या डिक्कीतून दोन चोरट्यांनी बँकेच्या कागदपत्रांसह एक लाखांची रोकड लांबवली. ही धक्कादायक घटना बुधवार, 3 रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
संधी मिळताच केली चोरी
विजय हिंगू यादव (51, गडकरी नगर, भुसावळ) हे व्यवसायाने कंत्राटदार असून बुधवारी दुपारी 12.25 वाजेच्या सुमारास ते पांडुरंग टॉकीजजवळील वर्षा गॅस एजन्सीत कामानिमित्त आले असता त्यांनी दुचाकी (एम.एच.15 बी.ए.9306) बाहेर पार्क केली. यावेळी दुचाकीच्या डिक्कीत एक लाखांची रोकड, अॅक्सीस व आयडीबीआय बँकेचे चेकबुक, रेल्वेचे व्हेरीएशन पेपर, आधारकार्ड व ईतर कागदपत्रे होती व दोन चोरट्यांनी अवघ्या पाच मिनिटात संधी साधून कागदपत्रे रोकड लांबवली. यादव हे बाहेर आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. सीसीटीव्हीत चोरीचा प्रकार कैद झाला आहे. 30 ते 35 वयोगटातील दोन संशयीत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास एएसआय जयेंद्र पगारे करीत आहेत.



