यावल पोलिसांची वॉश आऊट मोहिम : अवैध धंदे चालकांच्या गोटात खळबळ

हातभट्टी, गावठी दारूसह सार्वजनिक ठिकाण दारू पिणारे व ट्रिपलसिट प्रवास करणारे रडारवर


Yaval Police’s ‘Washout’ Operation: Stir Among Operators of Illegal Activities यावल (5 जून 2026) : यावल पोलीस ठाणे हद्दीत ऑल आऊट ऑपरेशनची विशेष मोहीम शुक्रवारी पहाटेपासून राबवण्यात आली. यामध्ये पिंप्री तापी नदीकाठी दारूच्या भट्ट्या नष्ट करण्यात आल्या तसेच सार्वजनिक ठिकाणी दारू पिणारे, दुचाकीवर ट्रिपलसिट हिंडणारे, बसस्थानक परिसरात रोमिओगीरी करणार्‍यांवर कारवाई करण्यात आली. यात काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर काहींना तंबी देेवून नोटीस देत सोडण्यात आले आहे.

कारवाईने उडाली खळबळ
यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पन्नीची व हात भट्टीची दारू हद्दपार करणे तसेच अवैध प्रवासी वाहतूक, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, बस स्थानकावरील रोडरोमिओ, ट्रीपलसीट दुचाकीवर हिंडणार्‍यांविरोधात ऑलआऊट ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली. पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळेंसह सहायक निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, सहाय्यक फौजदार अर्जुन सोनवणे, हवालदार उमेश सानप, उमेश महाजन, रोहील गणेश, किशोर परदेशी, प्रशांत पाटील, मोहन तायडे, नरेंद्र बागुले आदींच्या पथकाने ही मोहीम पार पाडली.



अवैध दारू भट्ट्यांवर कारवाई
प्रामुख्याने पिंप्री गावात तापी नदीच्या काठी आकाश निवृत्ती सपकाळे (रा.पिंप्री) हा गावठी दारू हातभट्टी लावून गाळणी करीत होता. त्या ठिकाणी पोलिसांचे पथक दाखल झाले. तेथून पोलिसांनी तब्बल 21 हजार 300 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून गावठी दारूचे रसायन नष्ट केले. या कारवाईदरम्यान आकाश सपकाळे या तिथून पसार झाला. यावल पोलिसात त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हवालदार उमेश सानप करीत आहे.

याच पथकाने तापी नदीकाठी पुन्हा एका ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी देखील एक जण गावठी हातभट्टीची दारू गाळणी करत होता. पोलिसांचे पथक पाहून तो तिथून पसार झाला. पोलिसांनी तेथून देखील तब्बल 30 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करून गावठी दारूची रसायन नष्ट केले.ही मोहिम रात्री उशीरा पर्यंत सुरू होती.

रोड रोमियो ताब्यात
पोलिसांच्या वतीने ऑपरेशन ऑल आउटच्या माध्यमातून ट्रिपल सीट दुचाकी चालवणे, अवैध वाहतूक करणे, त्यासह बस स्थानकावर टवाळकी करणार्‍या रोड रोमियोंना देखील ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणार्‍यांवर देखील कारवाई करण्यात आली. या कारवाईत काही जणांवर दंडात्मक कारवाई तर काही जणांना नोटीस व्दारे समज देत सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !