नाशिकमधील कार्पोरेट जिहाद : धर्मांतरासाठी दाखवले झाकीर नाईकचे व्हिडिओ : निदा खानची कबुली


‘Corporate Jihad’ in Nashik: Zakir Naik’s videos shown to induce conversion – Nida Khan’s admission. नाशिक (6 जून 2026) : धर्मांतर घडवून आणण्यासाठी पीडितेला वादग्रस्त धर्मांध पाकिस्तानी इस्लाम प्रचारक तारिक जमील आणि भारतीय प्रचारक झाकीर नाईक यांचे व्हिडिओ पाहण्यास भाग पाडले गेले. झाकीर नाईक याच्या जिहादी व्हिडिओच्या लिंक पीडितेला दिल्याची स्पष्ट कबुली निदा खानने दिली आहे. एसआयटीने या जबाबाचा उल्लेख दोषारोपपत्रामध्ये केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

9 जूनपासून खटल्याची सुनावणी
देशात खळबळ उडवून देणारे नाशिकच्या टीसीएस कंपनीतील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात आता मुख्य संशयित निदा खानच्या जबाबाची दोषारोपपत्रात नोंद करण्यात आली आहे. नाशिक येथील मुंबई नाका पोलिसात दाखल आठ गुन्ह्यांच्या खटल्याची पहिली सुनावणी 9 जून रोजी सुरू होणार आहे.

देवळाली कॅम्प पोलिसात दाखल गुन्ह्यातील पीडितेचे धर्मांतर करण्याकरिता तिचे ब्रेनवॉश करण्यासाठी जाणीवपूर्वक नियोजन करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तरुणीच्या मनात स्वतःच्या धर्माबद्दल शंका निर्माण व्हाव्यात आणि तिने धर्मांतर करावे, यासाठी तिला झाकीर नाईकच्या प्रक्षोभक आणि वादग्रस्त व्हिडिओच्या लिंक पीडितेला पाठवत तिला पाहण्यास भाग पाडल्याचे तपासात निष्पन्न झाले. एसआयटीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात निदा खानच्या या जबाबाचा उल्लेख केल्याने हे प्रकरण आता गंभीर वळणावर आले आहे. या प्रकरणात निदा खान, दानिश शेख, तौसिफ शेख, एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल आणि छत्रपती संभाजीनगर येथील घरमालक शेख यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

सलवार-कुर्ता, जीन्सऐवजी बुरखा घालण्याचा आग्रह
धर्मांतरासाठी जिहादी व्हिडिओ दाखवले. इस्लाम कुबूल केल्यास मानसिक ताण कमी होईल, असे पटवून दिले. दानिश शेखने तिच्याशी लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले. बुरखा घालण्याचे प्रशिक्षण, जीन्स, टॉप न घालता सलवार-कुर्ता घालण्यास दबाव टाकण्यात आला, असा जबाब पीडिता व तिच्या आईने दिल्याचा उल्लेख दोषारोपपत्रात आहे.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !