प्रेमसंबंधाच्या बदनामीला कंटाळून तरुणासह महिलेची आत्महत्या : संशयीताला अटक
Woman and young man commit suicide, driven to despair by defamation regarding their romantic relationship; suspect arrested. धुळे (6 जून 2026) : महिलेची तरुणासोबतच्या प्रेमसंबंधाची गावभर बदनामी करण्यात आल्याने 29 वर्षीय महिलेने 3 जून रोजी तर तरुणाने त्यानंतर दुसर्या दिवशी आत्महत्या केली ही धक्कादायक घटना धुळे तालुक्यातील दह्याणे गावात घडली. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने आत्महत्येपूर्वी तरुणाने मोबाइलमध्ये व्हिडिओ शूटिंग केले व बदनामीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केल्यानंतर भुर्या उर्फ दिनेश विनायकराव पवार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.
महिलेने केली आत्महत्या
विजयसोबत नाव जोडल्यामुळे बदनामी होत असल्यामुळे 29 वर्षीय महिलेने देखील 3 जून रोजी दुपारी दोन वाजता विष प्राशन केले व उपचार सुरू असतांना सायंकाळी सात वाजता महिलेचा मृत्यू झाला तर महिलेच्या मृत्यूनंतर 11 तासांनी विजयनेही आत्महत्या केली.
गावातील संशयीताला अटक
दह्याणे गावातील अजय हिरालाल ठाकरे (वय 26) यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या भावाला गेल्या काही दिवसांपासून गावातील भुर्या उर्फ दिनेश विनायकराव पवार हा त्रास देत होता शिवाय एका महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याची बदनामी देखील करत होता. याबाबत विजयने जाब विचारल्यावर दिनेशकडून दमदाटी केली होती. या मनस्तापातून विजयने घराच्या बाजुला असलेल्या बोळीत लोखंडी अँगलला रुमालाने गळफास घेतला. गुरुवारी सकाळी सहा वाजता हा प्रकार समोर आला. यानंतर विजयला अत्यवस्थ स्थितीत हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. विजयला आत्महत्या करण्यास दिनेशने प्रवृत्त केल्याचा गुन्हा धुळे तालुका पोलिसात दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक धनंजय पाटील करीत आहेत.


