ठाणे जिल्ह्यातील उपविभागीय अधिकार्‍याचा अपघाती मृत्यू


सातारा (6 जून 2026) : ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या उपविभागीय अधिकार्‍याचा कार अपघातात मृत्यू झाला. मात्र हा अपघात की घातपात ? असा असा सवाल उपस्थित केला जात आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात हा भीषण अपघात झाला. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

वाहन चालक पसार
अपघातानंतर घटनास्थळावरुन चालक चारचाकी कारसह पसार झाला. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील येथे मृदू व जलसंधारण विभागाच्या उपविभागीय अधिकारी लक्ष्मण मंडले यांना कराड शहरातील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल समोर पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास एका भरधाव चारचाकी कारने उडवले. या घटनेनंतर घटनास्थळावरुन चालक चारचाकी कारसह पसार झाला तर अधिकार्‍याचा जागीच मृत्यू झाला. कार चालकाने पलायन केल्याने हा अपघात की घातपात असा संशय व्यक्त केला जात आहे. कराड शहर पोलिसांकडून घटनास्थळावरील पंचनामा केला असून काही संशयितांची कसून चौकशी सुरू केली जात आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !