जळगावात 16 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर अत्याचार


16-year-old minor girl sexually assaulted in Jalgaon जळगाव (7 जून 2026) :  शहरातील एका भागातील 15 वर्षे 11 महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात नराधम आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला व त्यास अटक करण्यात आली.

काय आहे प्रकरण ?
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही एका भागातील रहिवासी असून डिसेंबर 2025 च्या पहिल्या आठवड्यात आरोपीने तिला फूस लावून तिच्या राहत्या घरून पळवून नेले. त्यानंतर एका भागातील स्वतःच्या राहत्या घरात डांबून ठेवून तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवले.

हा संपूर्ण प्रकार जळगाव येथील बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांसमोर पीडित मुलीने दिलेल्या जबाबानंतर उघडकीस आला. यानंतर पीडितेच्या 34 वर्षीय आईने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर फिर्याद दिल्यानंतर 4 जून 2026 रोजी दुपारी गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी आरोपी कृष्णा चंद्रभान तायडे (जळगाव) याला 4 जून 2026 रोजी सायंकाळी अटक केली आहे.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !