शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास देशभरात आंदोलन : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके


Nationwide agitation if the Education Minister does not resign: Abhijit Deepke, founder of the Cockroach Janata Party. नवी दिल्ली (8 जून 2026) : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी रविवारी रात्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द एक्सवर व्हिडिओ संदेश जारी करत म्हटले की जर 13 जूनपर्यंत शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही, तर मी स्वतः वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये आंदोलनासाठी जाईल व देशभरात आंदोलन छेडण्यात येईल.

काय म्हणाजे दीपके
दीपके संदेशात म्हणाले की, शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही, तर देशभरातील विद्यार्थी पुन्हा दिल्लीला जातील आणि शांततापूर्ण आंदोलन करतील. सीजीपीने 6 जून रोजी जंतर-मंतरवरही आंदोलन केले होते आणि परीक्षांमधील गोंधळावरून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अभिजीत 6 जून रोजी आंदोलनासाठी अमेरिकेतून भारतात आले आहेत. ते रविवारी सकाळी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या घरी पोहोचले. त्यांनी संध्याकाळी एक पत्रकार परिषद घेतली आणि म्हटले- गेल्या 10-12 वर्षांपासून देशाचे राजकारण हिंदू-मुस्लिम मुद्यांवर केंद्रित राहिले आहे. यामुळे रोजगार मिळणार नाही.

24 तासांत सहा लाखांहून अधिक फॉलोअर्स वाढले
कॉकरोच जनता पार्टीच्या इंस्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्याही वाढली आहे. आंदोलनापूर्वी त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 2.21 कोटी होती. 7 जून रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत ही संख्या वाढून 2.27 कोटी झाली. द एक्सवर त्यांचे 2.70 लाख फॉलोअर्स आहेत.

सरन्यायाधीशांचे विान अन कॉकरोज जनता पार्टीची निर्मिती
कॉकरोच जनता पार्टीचा जन्म सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तरुणांवर केलेल्या एका विधानानंतर झाला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी 15 मे रोजी एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान देशातील बेरोजगार तरुणांना झुरळे म्हटले होते. ते म्हणाले की, काही बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, जे नंतर मीडिया, सोशल मीडिया किंवा आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करू लागतात.

सरन्यायाधीश आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने एका वकिलाच्या याचिकेवर सुनावणी केली, ज्यात त्याने वरिष्ठ वकील दर्जा मिळवण्याची मागणी केली होती. खंडपीठाने वकिलाला फटकारत म्हटले – समाजात आधीच परजीवी आहेत, जे व्यवस्थेवर हल्ला करतात.

यानंतर 16 मे रोजी अमेरिकेतून अभिजीत दीपके यांनी कॉकरोच जनता पार्टीची सुरुवात केली. एक्स-इंस्टाग्रामवर खाते तयार केले. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी 22 मे रोजी वेबसाईटवर ऑनलाइन याचिका दाखल केली. या याचिकेवर आठ लाखांहून अधिक लोकांनी स्वाक्षरी केली होती.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !