जामनेर तालुक्यात भीषण अपघात : नाशिकच्या दोन महिला जागीच ठार

सीहोरवून परतणार्‍या भाविकांच्या क्रुझरला भरधाव कारची धडक ः 12 जण जखमी


Horrific accident in Jamner Taluka : Two women from Nashik killed on the spot. जामनेर (8 जून 2026) : सीहोर दर्शनाला गेलेल्या भाविकांच्या क्रुझरला कारने जोरदार धडक दिल्याने नाशिकमधील दोन महिलांचा मृत्यू झाला तर 12 भाविक जखमी झाले. हा भीषण अपघात जामनेर तालुक्यातील बोदवड रस्त्यावरील मालदाभाडीजवळ रविवार, 7 जूनला संध्याकाळी पावणेसहा वाजेदरम्यान घडला. चंद्रकला सूर्यकांत माळी म(52, रा.नाशिक) व रखमाबाई भामरे (55, रा. नाशिक) अशी मृतांची नावे आहेत.

दर्शनाहून परतताना अपघात
सीहोर येथे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या दर्शनासाठी भाविक क्रुझरने गेले होते व परतीच्या प्रवासात कु्रझरला कारने उडवल्याने अपघात घडला. या अपघातात नाशिकच्या दोघा महिलांचा मृत्यू ओढवला तर 12 भाविक जखमी झाले. जखमींमध्ये जामनेर तालुक्यातील 10 तर नाशिक आणि जळगावमधील एकाचा समावेश आहे. जखमींवर खाजगी रुग्णालय व जळगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचा सुरू आहेत.

हे भाविक अपघातात जखमी
मनीषा मनोज पवार (35, रा.नेरी), चैतन्य मनोज पवार (14, रा.नेरी), वैशाली मधुकर पवार (39, रा.खादगाव), नीता मधुकर चिंचोले (40, रा.खादगाव), स्वाती गोकूळ चिंचोले (30, रा.खादगाव), प्रीती गजानन बिराडे (रा.खादगाव), काव्य गजानन बिराडे (5, खादगाव), नंदा विनोद माळी (40, रा.जळगाव), हर्षल माळी (रा.नाशिक), पद्माबाई सुरेश पाटील (70, रा.खादगाव), उज्ज्वला एकनाथ निकम (39, रा. खादगाव), सरला तायडे (40, रा.खादगाव) हे भाविक अपतातात जखमी झाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !