यावल शहरातील वृद्धाची आजाराला कंटाळून आत्महत्या


यावल (11 जून 2026) : यावल शहरातील देशमुख वाडा, लहान मारुती मंदिर भागातील 65 वर्षीय वृद्धाने आजाराला कंटाळून अंजाळे गावाजवळील मोर नदीच्या पात्रात उडी घेतली. ही घटना बुधवारी उघडकीस आली. त्यांना तातडीने तेथून काढून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मोर नदीत घेतली उडी
यावलच्या देशमुखवाडा भागातील वसंत अर्जुन माळी (65) हे वृद्ध दीर्घ आजाराला खूप कंटाळले होते. आजाराला कंटाळून ते मंगळवारी सायंकाळी घराच्या बाहेर निघून गेले होते. कुटुंबाकडून त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ते कुठेच आढळले नाहीत. अंजाळे गावाजवळील मोर नदीच्या पात्रात एका वृध्दाने पाण्यात उडी घेतल्याची माहिती नागरीकांकडून मिळाल्यानंतर माळी यांचे कुटुंबीय तातडीने तिथे दाखल झाले. माळी यांना ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले.

याप्रकरणी गोलू माळी यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, पुतणे, सुना नातवंडे असा परिवार आहे. ते रवींद्र माळी यांचे वडील तर किशोर उर्फ गोलू माळी व राहुल माळी यांचे मोठे काका होत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !