अमळनेरात घराला आग : संसारोपयोगी साहित्य खाक

अग्निशमन दलाने जीव धोक्यात घालून गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला


House catches fire in Amalner ; household belongings reduced to ashes अमळनेर (14 जून 2026) : अमळनेर शहरातील गांधलीपुर्‍यात मेहतर कॉलनीत एका घराला आग लागून घरातील लाखोंचे संसारोपयोगी साहित्य खाक झाले. आगीची शनिवार, 13 रोजी दुपारी 2.27 वाजेच्या सुमारास घडली.

लाखो रुपयांचे साहित्य खाक
अमळनेरच्या मेहतर कॉलनीतील पपू वसंत कलोसे हे आपल्या घरातील लोकांसह बाहेर गेल्यानंतर असताना शनिवारी दुपारी अचानक आग लागली. नागरिकांनी पालिकेला कळवले मात्र अरुंद गल्ली असल्याने वाहन घरापर्यंत पोहचले नाहीत आणि जळणारे घर दुसर्‍या मजल्यावर असल्याने अग्निशमन दलाचे कर्मचारी फारूख शेख, दिनेश बिर्‍हाडे, रफिक पठाण, आकाश बाविस्कर, लखन कंखरे यांनी कसरत करून पाईप वाढवून दुसर्‍या घरांवर चढून आग विझवण्याचे प्रयत्न केले.



तर झाला असता सिलिंडर स्फोट
घरात प्रचंड धूर झाला असतानाच गॅस सिलिंडर अडकले होते. प्रचंड उष्णता आणि जीव गुदमरत असताना अग्निशमन दलाचे कर्मचार्‍यांनी धाडस दाखवत घरात प्रवेश करीत गॅस सिलिंडर बाहेर काढले. अन्यथा कोणत्याही क्षणी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आजूबाजूला आणि मेहतर कॉलनीला धोका निर्माण झाला असता.

भीषण आगीत घरातील एसी, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, कपाट, पलंग तसेच घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू जाळून खाक झाल्या. उपस्थित नागरिकांनी अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांचे कौतुक केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !