यावल शहरात बालकामगार आढळले : तीन दुकानदारांविरोधात गुन्हा


Child laborers found in Yaval city : Case registered against three shopkeepers यावल (14 जून 2026) : शहरासह चितोडा शिवारात एका रसवंतीवर आणी मांडा अर्थात रूमाली रोटी तयार करणार्‍या व्यावसायीकाकडे पोलिसांनी कारवाई करीत तेथून बाल कामगारांची मुक्तता केली. दोन्ही ठिकाणी चार बाल कामगार आढळल्याने ावल पोलिसात तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

कारवाईने उडाली खळबळ
शहरातील फैजपूर जाणार्‍या रस्त्यावर चितोडा गाव- शिवारात सचिन धांडे यांच्या रसवंतीवर पोलिसांनी तपासणी केली असता या ठिकाणी दोन 13 वर्षीय अल्पवयीन मुलांना बालकामगार म्हणून कामावर ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोन्ही बालकांची तेथून सुटका केली. या प्रकरणी सचिन धांडे यांच्याविरुद्ध बाल कामगार कायद्यान्वये यावल पोलिसात पोलीस हवालदार अनिल साळुंखे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.


यावल शहरातील चोपडा रस्त्यावर मांडा अर्थात रूमाली रोटी तयार करण्याच्या दुकानात एक 12 वर्षीय अल्पवयीन मुलगा आणि एक 13 वर्षीय अल्पवयीन मुलगा अशी दोन्ही बालकामगार म्हणून कामावर होती. येथेदेखील यावल पोलिसांच्या पथकाने छापा टाकून दोघा बाल कामगारांची मुक्तता केली. या प्रकरणी यावल पोलिसात पोलीस नाईक पुरुषोत्तम पाटील यांच्या फिर्यादीवरून आसीफ खान कुरेशी व आजीम साहेब या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !