उसनवारीचे पैसे न दिल्याच्या वादातून तिघांना मारहाण


Three people assaulted following a dispute over the non-repayment of borrowed money अमळनेर (14 जून 2026) : उसनवार दिलेले पैसे परत दिले न दिल्याच्या वादातून एकाने तिघांना बांबूने मारहाण करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील रणाईचे येथे 11 रोजी रात्री 8 वाजता घडली.

काय आहे प्रकरण
किशोर रमेश देवरे रा रणाईचे हा सलून व्यावसायीक आपल्या आई-वडील मुलगीसह दुकानाजवळ गप्पा मारत असताना गावातील गुलाब महारु पाटील हा तिकडून आला. त्याने दिलेले उसनवारी पैसे किशोर परत करत नव्हता म्हणून त्याने त्याच्या हातातील बांबूने किशोरच्या डोक्यात मारले त्यामुळे किशोर चक्कर येऊन पडला. त्याचे आई-वडील मुलगी आवरायला गेले असता त्याने किशोरचे वडील रमेश दगडू देवरे याना हातावर आणि आई आशाबाई यांना पाठीला व कमरेला मारून जखमी केले. मुलीला ढकलून खाली पाडले.



तू उसनवार घेतलेले पैसे परत केले नाही तर तुला मारून टाकेल, अशी धमकी दिली. किशोरने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हेड कॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !