घरफोडी करणारी शिरपूरातील टोळी जाळ्यात : 2.27 लाखांचा मुद्देमाल जप्त


Shirpur-based burglary gang nabbed ; stolen goods worth ₹2.27 lakh seized. शिरपूर (14 जून 2026) : शिरपूर शहर पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून तब्बल दोन लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

घरफोडीची उकल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरपूर शहरातील फुलमाळी परिसरात राहणारे किरण मगर ठाकूर (45, फुलेनगर, शिंगावे शिवार, शिरपूर) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत एमआय कंपनीचा टीव्ही, रियल मी कंपनीचा मोबाईल फोन चोरी करून नेला होता. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.



गोपनीय माहितीवरून आरोपी जाळ्यात
गुन्ह्याचा तपास सुरू असताना डी.बी.पथकाला गस्तीदरम्यान कार (जी.जे.26 ए.ई.3354) हे संशयास्पद फिरताना दिसले असताना वाहनातील संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आल्यानंतर आरोपींनी आपली नावे जयेश संजय धनगर (21, क्रांती नगर, शिरपूर), मुकेश किशोर पाटील (22, आढे, ता.शिरपूर) व आकाश उर्फ रितीक चंदू माळी (22, गवळीवाडा, ता.शिरपूर) सांगितली व शिरपूरातील घरफोडीची कबुली दिली. आरोपींकडून चोरीतील 43 इंची एलईडी टीव्ही, एक अँड्रॉइड मोबाईल फोन आणि चोरीसाठी वापरलेली दुचाकी असा एकूण 2,27,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस तपासात आरोपींवर शिरपूर शहर पोलीस ठाण्यात यापूर्वीही घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, रवींद्र आखडमल, अतुल पाटील, सचिन वाघ, विनोद आखडमल, गोविंद माळी, योगेश दाभाडे, मनोज महाजन, सोमा ठाकरे, आरीफ तडवी, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, भटू साळुंखे, गुन्हे शाखेचे हवालदार अमोल पाटील आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !