महाराष्ट्र हळहळला : भरधाव पिकअपर विहिरीत कोसळल्याने आठ भाविक ठार
Maharashtra Shocked: Eight Devotees Killed as Speeding Pickup Plunges into Well सोलापूर (14 जून 2026) : सिद्धनाथांच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. सिद्धनाथांचं दर्शन करून गावाकडे परतणार्या भाविकांचे वाहन एका विहिरीत कोसळल्याने आठ भाविकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर सहा भाविक जखमी झाले आहेत. माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी गावानजीक हा अपघात घडला. दरम्यान, सरकारने मृतांच्या वारसांना पाच लाखांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे.
भीषण अपघाताने महाराष्ट्र हळहळला
म्हसवड-पंढरपूर मार्गावरून सिद्धनाथांच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. सिद्धनाथांचं दर्शन करून गावाकडे परताना माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी गावानजीक एका विहिरीत पिकअप गाडी कोसळली. गाडी कोसळून भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. मृतांमध्ये महिला, लहान मुलांचा देखील समावेश आहे.


अत्यंत दुर्दैवी घटना
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. मी देखील या संदर्भात माहिती घेत आहे. एवढ्या लोकांचा मृत्यू होत आहे आणि त्यातून अजून गोष्टी स्पष्ट झालेल्या नाहीत. पण आम्ही या संदर्भात माहिती घेत आहोत आणि मदत पोहोचवत आहोत.
पुढे बोलताना जयकुमार गोरे म्हणाले, विहीरीची माहिती देखील घेतली जाणार आहे. विहिरीला कठडा आहे की नाही तसेच जर नसेलच तर मग त्यावर कारवाई केली जाईल. रस्त्याच्या बाजूलाच विहिर आहे, तर त्याला कठडा असणे बंधनकारक आहे पण जर कठडा नसेल तर चौकशी होईल आणि कारवाई होईल. कारवाई करणे हा विषय वेगळा आहे, पण लोकांचा मृत्यू होणे हे अतिशय दुर्दैवी आहे.

