चोपड्यातील तरुणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार
चोपडा (15 जून 2026) : लग्न करण्याच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार करण्यात आला व फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर तरुणीने चोपडा शहर पोलिसात तक्रार दिल्यावरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे प्रकरण ?
चोपडा शहरातील एका परिसरातील 24 वर्षीय तरुणीचे संशयित सईद सय्यद असद (26, चोपडा) सोबत आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. संशयिताने लग्नाचे आश्वासन देत वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, 1 जून रोजी लग्न ठरलेले असतानाही समाजाच्या बैठकीत लग्नास नकार देत तरुणीची फसवणूक करण्यात आली व तरुणीच्या तक्रारीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी करीत आहेत. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.



