भुसावळातील तरुणाचा वाघूर धरणात बुडून मृत्यू


Youth from Bhusawal drowns in Waghur Dam जळगाव (15 जून 2026) : भुसावळातील 22 वर्षीय युवकाचा कंडारी गावाजवळील वाघूर धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना 13 जून रोजी सायंकाळी घडली. धरणातील पाण्याची खोली न समजल्याने आंघोळीसाठी उतरलेल्या तीन युवकांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला. मोहम्मद आवेश अब्दुल गफर (गवळी, 22, रा. स्टेशनजवळ, 12 गवळीवाडा, भुसावळ) असे मृताचे नाव आहे.

पोहण्यासाठी गेल्यानंतर दुर्घटना
जळगाव शहरापासून जवळ असलेल्या वाघूर धरण परिसरात भुसावळातील मोहम्मद कैफ, अदनान खान (रा.मटन मार्केट, शिवाजीनगर, भुसावळ) आणि मोहम्मद आवेश अब्दुल गफर (गवळी, वय 26, गवळीवाडा, भुसावळ) हे तिघे मित्र फिरण्यासाठी आले होते. धरणातील पाणी पाहून त्यांना अंघोळीचा मोह झाला मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. यावेळी मोहम्मद कैफ आणि अदनान खान यांना वाचवण्यात यश आले मात्र मोहम्मद आवेश अब्दुल गफर यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

मयत मोहम्मद आवेश हे भुसावळ रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली.

घटनेनंतर सहाय्यक फौजदार गफूर तडवी, हेड कॉन्स्टेबल मुकुंदा पाटील, हेड कॉन्स्टेबल गजू महाजन, रायपूर येथील पोलीस पाटील रामसिंग परदेशी, रायपूर ग्रा.पं. सदस्य वसंत धनगर तसेच तलाठी निधी शांतीलाल मानेकर, कोतवाल मंदाताई सोनवणे, तलाठी भावेश रोहिमारे, कंडारी येथील पोलीस पाटील कैलास सुर्वे आणि यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने युवकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले. अनेक तासांच्या शोध मोहिमेनंतर भुसावळ येथील शेख रिजवान शेख शब्बीर या युवकाच्या मदतीने सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास मोहम्मद आवेश यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. यावेळी मृताच्या चुलत भावाने मृतदेहाची ओळख पटवली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !