पथराळे गावात साकळी फाट्याजवळ एकाला जबर मारहाण

डोक्यात मारला फावडा : यावल पोलिसात गुन्हा दाखल


Man severely beaten near Sakali Phata in Pathrale village यावल (17 जून 2026) : यावल तालुक्यातील पथराळे गावातील शिवारात साकळी फाट्याजवळ पूर्व वैमनस्यातुन एकाने ट्रॅक्टरव्दारे दुचाकीला कट मारला व कट का मारला अशा विचारलेल्या कारणावरून चार जणांनी एकास शिविगाळ करून मारहाण करीत त्यांच्या डोक्यात फावड्याने मारून त्यास ठार मारून टाकण्याचा प्रयत्न केला. ही घटना 6 जून रोजी दुपारी घडली. या प्रकरणी यावल पोलिसात सोमवारी रात्री चार जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण ?
पथराडे, ता.यावल गावाच्या शिवारात साकळी फाट्याजवळ समाधान मंगल सोनवणे (46) हे त्यांच्या शेताच्या समोरील रस्त्यावरून दुचाकीव्दारे जात असताना तेथे पूर्व वैमनस्यातून प्रवीण उर्फ गोट्या तुकाराम सोनवणे यांनी ट्रॅक्टरद्वारे त्यांच्या दुचाकीला कट मारला. तू कट का मारला असे विचारल्याच्या कारणावरून प्रवीण उर्फ गोट्या सोनवणे, विशाल राजेंद्र सोनवणे, प्रशांत शरद सोनवणे व सचिन मधुकर तायडे (सर्व रा.शिरसाड, ता.यावल) या चार जणांनी समाधान सोनवणे यांना शिवीगाळ करून मारहाण केली व फावड्याने त्यांच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली व त्यांना ठार मारून टाकण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी यावल पोलिसात समाधान सोनवणे यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !