जळगाव गुन्हे शाखेची कामगिरी : चोरीच्या दोन दुचाकींसह चाळीसगावातील चोरट्यांना बेड्या
Jalgaon Crime Branch’s performance: Thieves from Chalisgaon arrested along with two stolen bikes चाळीसगाव (17 जून 2026) : दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात समांतर तपासादरम्यान गुन्हे शाखेने चाळीसगावातील चोरट्याला बेड्या ठोकत त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त केल्या आहेत तर चोरी केलेली दुचाकी विक्री केल्याप्रकरणी खरेदीदारालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
काय घडले चाळीसगावात ?
चाळीसगाव शहर पोलिसात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल होता व समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेला संशयीत राहुल सुभाष भिसे (रा. हनुमानसिंग नगर, चाळीसगाव) याची माहिती मिळाल्यानंतर त्याने दुचाकी चोरीची कबुली देत होंडा युनिकॉर्न मोटारसायकल काढून दिली तसेच अन्य एक एचएफ डिलक्स मोटारसायकलची चोरी कबुल करीत ही दुचाकी प्रशांत दीपक राजपूत (रा.हरीगिरी बाबा नगर, पाटणादेवी रोड, चाळीसगाव) याला 20 हजार रुपयांत विकल्याची कबुली दिली.
चोरीची दुचाकी खरेदी करणार्या प्रशांत राजपूत यासदेखील ताब्यात घेण्यात आले. आर.सी.बुक नंतर देतो म्हणून दुचाकी खरेदी करण्यात आल्याचे राजपूत याने पोलिसांना सांगितले. दोन्ही आरोपींना 80 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकींसह चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अन्य कारवाईत एक दुचाकी जप्त
चाळीसगावातील अहिल्याबाई होळकर चौक परिसरात विनानंबर प्लेटची मोटारसायकल घेऊन फिरणाीरा संशयीत प्रशांत दत्तात्रय राठोड ( 27, रा.यशवंतनगर रोड, चाळीसगाव) यास गस्तीदरम्यान थांबवण्यात आले असता त्याने दुचाकीच्या कागदपत्रांबात समाधानकारक माहिती न दिल्याने त्याच्यासह 25 हजार रुपये किंमतीची यामाहा एफझेड मोटारसायकल जप्त करण्यात आली. दुचाकीसह संशयीताला चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, हवालदार लक्ष्मण पाटील, कॉन्स्टेबल राहुल पाटील, कॉन्स्टेबल भूषण पाटील आदींच्या पथकाने केली.




