जळगावातील माजी मंत्री देवकरांच्या संस्थेत चार कोटी 85 लाखांचा अपहार : संशयीताविरोधात गुन्हा


Misappropriation of ₹4.85 crore at Jalgaon-based institution linked to former minister Devkar ; case registered against suspect. जळगाव (17 जून 2026) : जळगावचे माजी राज्यमंत्री गुलाबराव बाबुराव देवकर यांच्या संस्थेत चार कोटी 85 लाख तीन हजार 582 रुपयांच्या आर्थिक अपहार व फसवणुकीचा गंभीर घडला आहे. श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ, जळगाव या संस्थेअंतर्गत येणार्‍या महाविद्यालयांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्यानंतर लोकेश उर्फ चेतन गणेश कोल्हे (रा.नशिराबाद, ता. जि. जळगाव) विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

काय आहे प्रकरण ?
गुलाबराव देवकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 1 ऑगस्ट 2020 ते 31 मे 2023 या कालावधीत आरोपी लोकेश कोल्हे याने त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ, जळगाव या संस्थेच्या अंतर्गत येणार्‍या महाविद्यालयांमधील आर्थिक व्यवहारांमध्ये एकूण चार कोटी 85 लाख 3 हजार 582 रुपयांचा अपहार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच संस्थेची फसवणूक केल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा गुन्हा 16 जून 2026 रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन अव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !