शहादा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी : गुजरातमध्ये जाणारी 65 लाखांची अवैध दारू जप्त

हरियाणातील चालक व क्लिनरला बेड्या : वाहनासह 90 लाखांचा मुद्देमाल जप्त : अवैध दारू तस्करी ऐरणीवर


Bold action by Shahada Police: Illicit liquor worth ₹65 lakh bound for Gujarat seized शहादा (20 जून 2026) : हरियाणानिर्मित दारूची गुजरातमध्ये अवैधरित्या वाहतूक होणार असल्याची माहिती शहादा पोलिसांना मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचत दहा चाकी कंटेनर जप्त केला. तब्बल 65 लाखांची विदेशी दारू तसेच 25 लाख रुपये किंमतीचा दहा चाकी कंटेनर जप्त करण्यात आला. या धडाकेबाज कारवाईने अवैधरित्या मद्याची तस्करी करणार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. राजस्थानातील चालकासह वाहकाला बेड्या ठोकण्यात आल्या असून आता पुरवठादार व खरेदीदार पोलिसांच्या रडारवर आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना शुक्रवार, 19 जून रोजी गुप्त बातमीदारामार्फत हरियाणानिर्मित दारूची गुजरातमध्ये तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने प्रकाशा दूरक्षेत्रात शुक्रवार, 19 रोजी सापळा रचला. अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर (आर.जे.32 जी.सी.0812) आल्यानंतर संबंधित चालकास अडवल्यानंतर त्यास कंटेनरमधील मालाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने सुरूवातीला उडवा-उडवीचे उत्तरे देत कुरीयरचा माल असल्याचे सांगितले. पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी वाहन चालक नरेशकुमार रामभज कश्यप (38) व क्लिनर मनीराम सुंदर कश्यप (37, दोन्ही रा.भासपदमका, ता.पदोडी, जि.गुडगाव, हरियाणा) यांना वाहनासह ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात आणले व पंचांसमक्ष झडती घेतल्यानंतर वाहनात हरियाणानिर्मि विदेशी मद्य आढळल्याने मुद्देमाल जप्त करण्यात आला.




75 लाखांचे विदेशी मद्य जप्त
कंटेनरमधून रॉयल चॅलेंज, रॉयल स्टॅग, मॅजीक मुव्हमेंट ग्रीन अ‍ॅपल वोडका, मॅजीक मुव्हमेंट जमुन स्पाईस मिंट कंपनीचा वोडका यासह विविध कंपनीचा एकूण 65 लाख 29 हजार 200 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला तर 25 लाख रुपये किंमतीचा कंटेनर मिळून 90 लाख 29 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपास सहा.पोलीस निरीक्षक चंद्रशेखर देसले करीत आहेत.

यांनी केली कारवाई
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, शहादा ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रशेखर देसले, दीपक चौधरी, पोलीस कर्मचारी भगवान सावळे, कपिल मंदील आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !