फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारेंना जीवे मारण्याची धमकी


Firebrand leader Sushma Andhare receives death threat मुंबई (21 जून 2026) : शिवसेना ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी फुटीर खासदार नागेश आष्टीकरच्या माणसाने जीवे मारण्याची धमकी दिली असून त्याबाबत अंधारे यांनी आरोप करीत धमकी देणार्‍याचा फोन नंबरच फेसबुकवर शेअर केला आहे.

आष्टीकरच्या माणसाकडून धमकीचा दावा
‘ऑपरेश टायगर’ राबवत शिंदे गटाने आता ठाकरे गटाचे सहा खासदार गळाला लावले आहे. या खासदारांचा प्रवेश अद्याप झाला नसल्यामुळे तुर्तास ब्रेक लागला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक वाद पेटला आहे. पण, आता या वादाला वेगळंच वळण मिळालं आहे. फुटीर खासदार नागेश आष्टीकरच्या माणसाने या फोन नंबर वरून आताच मला जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.




खासदारांच्या घराबाहेर बंदोबस्त
ठाकरेंच्या पक्षातून सहा खासदार फुटल्याच्या चर्चा सुरू असतानाच या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले असून काही ठिकाणी खासदारांविरोधात आंदोलन करण्यात आले. या खासदारांचे प्रतिकात्मक पुतळे शिवसैनिकांनी जाळले आहेत. या खासदारांबाबत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे. खासदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक आक्रमक झाल्याच्या पार्श्वभूमीवर असतानाच खबरदारीचा उपाय म्हणून या सहाही खासदारांच्या घरांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आलीय. या खासदारांच्या घराबाहेर आणि कार्यालयाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !