विवाहित तरुणाचा अमळनेरच्या तरुणीशी लग्नासाठी आग्रह : सोशल मिडीयासह नातेवाईकांमध्ये बदनामी केल्याने तरुणाविरोधात गुन्हा


अमळनेर (21 जून 2026) : विवाहित असलेल्या तरुणाने अमळनेरच्या तरुणीसोबत लग्नासाठी हट्ट धरला व लग्न न केल्यास तुझी समाजात बदनामी करेल तुझे बदनामी करेल व तसे व्हिडीओ व्हायरल करेल, अशी धमकी दिली. तरुणाचा जाच असह्य झाल्याने पीडीतेने हिंमत दाखवून वाकडी, ता.पनवेल, जि.रायगड जिल्ह्यातील एक तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

असे आहे प्रकरण
अमळनेरातील तरुणीने या संदर्भात दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयीत अभिषेक तानाजी हटकर (वाकडी, ता.पनवेल) हा 2019 मध्ये तरुणीला पाहायला आला होता मात्र तरुणीचे लग्न दुसर्‍या तरुणाशी झाले. त्यानंतर तरुणीची पहिल्या पतीसोबत फारकत झाली व त्यानंतर 2023 मध्ये अभिषेकने तरुणीला इन्स्ट्राग्रामवर ओळख करून माझ्याशी लग्न करावे म्हणून आग्रह धरला. तरुणीने नकार दिल्यानंतर अभिषेक आधीच विवाहित असल्याचे व त्याला मुलबाळ असल्याचे तरुणीला कळाले. संशयीत अभिषेकने मी माझ्या पत्नीला फारकत देणार आहे, तू माझ्याशी लग्न कर असा आग्रह केला. तरुणीने पुन्हा नकार दिल्याने त्याने तुझे बदनामीकारक फोटो व्हायरल करेल, तुझी समाजात बदनामी करेल, तुझे लग्न होऊ देणार नाही झालेच तर तुझ्या सासरी येऊन बदनामी करेल, अशी धमकी दिली. यावेळी तरुणीने त्याला धाडस करून सांगितले की, तुला जे करायचे ते कर मी घाबरत नाही.




मेहुण्यांच्या मोबाईलवर पाठवले फोटो
आरोपीने तरुणींच्या मेहुण्यांच्या मोबाईलवर बदनामीकारक फोटो पाठवले होते. 13 सप्टेंबर 2025 रोजी अभिषेक विरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज केल्यानंतरही तो घाबरला नाही व त्याने पीडीत तरुणींच्या नातेवाईकांकडे, कार्यालयातील सहकार्‍यांकडे बदनामी केल्याने तरुणीच्या वडिलांनी पुन्हा 18 मे 2026 रोजी पुन्हा अभिषेक विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला. यानंतर मुलीच्या घरच्यांनी अभिषेकच्या कुटुंबाला याबाबत सांगितले असता त्यांनी आम्हाला काही माहीत नाही, तुम्हाला काय करायचे ते करा, असे सांगितले होते. त्यानंतरही अभिषेकने नातेवाईकांकडे तरुणीची बदनामी सुरूच ठेवल्याने तरुणीने अमळनेर पोलिसात अभिषेक हटकर विरोधात गुन्हा दाखल केला. तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !