मुक्ताईनगरात दोन लाखांच्या रोकडसह सव्वातीन लाखांचा ऐवज लूटला : चिखलीच्या भाऊ, वहिनीसह चौघांविरोधात गुन्हा


Cash worth ₹2 lakh and valuables worth ₹3.25 lakh looted in Muktainagar; case registered against four individuals, including a man and his sister-in-law from Chikhli मुक्ताईनगर (23 जून 2026) : नातेसंबंध का ठेवायचे नाहीत? विचारल्याचा राग आल्याने मुक्ताईनगरात आलेल्या चिखली तालुक्यातील मोठ्या भावासह वहिनी व चौघांनी विवाहितेला मारहाण करीत घरातील कपाटातून दोन लाखांची रोकड व सव्वा लाखांचे दागिने बळजबरीने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना गुरुवार, 21 रोजी रात्री 11.30 वाजता घडली. या प्रकरणी चार जणांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण
निता शिवराज पाटील (42, बोदवड रोड, मुक्ताईनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयीत अनंता शिवाजी येळवंडे, पूजा उर्फ आशा अनंता येळवंडे, भगवान श्रीकिसन येळवंडे व रमेश श्रीकिसन येळवंडे (मंगरूळ नवघरे, ता.चिखली, जि.बुलढाणा) आदींनी गुरुवार, 21 रोजी रात्री 11.30 वाजता घरात शिरून चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच घरातील कपाटात ठेवलेले दोन लाख व सव्वा लाखांची सोन्याचे दागिने हिसकावून नेले. फिर्यादीचा मोठा भाऊ अनंताची पत्नी पूजाने फिर्यादीसह इतर नातेवाईकांना फिर्यादीसोबत नाते ठेवायचे नाही, असे सांगितल्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक सुरेश मेढे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !