नागपूरची धूरा धाडसी पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे : राज्यातील 14 आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या
Bold police officer Vishwas Nangare Patil takes charge of Nagpur ; 14 IPS officers transferred across the state.मुंबई (24 जून 2026) : राज्यातील 14 बड्या आयपीएस अधिकार्यांच्या राज्य सरकारने बदल्या केल्या आहेत. नागपूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून मोठा गदारोळ झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस विरोधकांच्या निशाण्यावर होते. या अनुषागाने नागपूर पोलीस आयुक्तपदाची जवाबदारी धाडसी पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे तर नागपूरचे रवींद्र सिंघल आता एसीबीचे अपर महासंचालक असतील. दरम्यान, नागपूरातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी नागपूरला विश्वास नागरे पाटील यांना नेण्यात आल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.
या अधिकार्यांच्या झाल्या बदल्या

छत्रत्रपती संभाजीनगरचे उपायुक्त प्रशांत मोहिते यांची डायल 112, नवी मुंबई येथे बदली
हिंगोली अधीक्षक निलभ रोहन यांची नांदेड पोलीस अधीक्षकपदी बदली.
नांदेड अधीक्षक अभिनाश कुमार यांची पुणे शहर पोलीस उपायुक्तपदी बदली
खामगाव अपर अधीक्षक श्रीमंत लाड यांची हिंगोली पोलीस अधीक्षकपदी बदली
नवी मुंबई डायल पोलीस उपायुक्त रुपाली अंबुरे यांची पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे बदली
नागपूर पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांची छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस उपायुक्तपदी बदली
अमरावती शहर पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांची नागपूर शहर पोलीस उपायुक्तपदी बदली
राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 17, चंद्रपूर येथील समादेशक पीयूष जगताप यांची खामगाव अपर पोलीस अधीक्षकपदी बदली
मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त, दत्तात्रय शिंदे यांची पदोन्नतीने पोलीस महानिरीक्षक, राज्य गुन्हे अभिलेख विभाग, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे बदली
सायबर मुंबई पोलीस उपमहानिरीक्षक, संजय शिंत्रे यांची अपर पोलीस आयुक्त, मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयात बदली
न्यायिक व तांत्रिक पोलीस महासंचालक संजय वर्मा यांची पोलीस महासंचालक, पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ या पदावर बदली
पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या पोलीस महासंचालक अर्चना त्यागी यांची पोलीस महासंचालक, न्यायिक व तांत्रिक या पदावर नियुक्ती
गडचिरोली राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 13 चे समादेशक नारायण शिरगांवकर यांची समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 19, कुरळगाव, अहिल्यानगर येथे बदली
अमरावती गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस अधीक्षक प्रांजली सोनावणे यांची अमरावती पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती
