लिव्हईनच्या वादातून निंभोर्यात एकावर चाकूहल्ला : तरुणीही जखमी
Man stabbed in Nimbhora following dispute over live-in relationship ; young woman also injured भुसावळ (25 जून 20226) : अंडाभाव विक्रेत्या तरुणासोबत बहिण लिव्हईनमध्ये राहत असल्याच्या रागातून तरुणीच्या नातेवाईकांनी तरुणावर चाकूने हल्ला केला तर तरुणीला मारहाण केली. या प्रकरणी निंभोरा पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन जणांविरोधात गुन्हा
गोकुळ आकाश गायकवाड (23) हा तरुण निंभोर्यात राहतो व अंडाभूर्जीची गाडी लावून व्यवसाय करतो. संशयीताची बहिण ही तक्रारदारासासेबत लिव्हईनमध्ये राहत असल्याच्या रागातून तरुणीचा भाऊ अजय ज्ञानेश्वर कोळी व मनीषा ज्ञानेश्वर कोळी (निंभोरा, ता.भुसावळ) यांनी 22 रोजी सकाळी 10 वाजता वाद घालत गोकुळवर चाकूने हल्ला केला तर तरुणीला चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मनोज येऊलकर करीत आहेत.

