व्हेनेझुएलामध्ये शक्तीशाली दोन भूकंप :10 हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू

126 वर्षांतील सर्वात मोठा : अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या


Two powerful earthquakes in Venezuela: Over 10,000 people dead. कराकस (25 जून 2026) : व्हेनेझुएलामध्ये बुधवारी संध्याकाळी म्हणजेच भारतीय वेळेनुसार गुरुवारी सकाळी दोन शक्तिशाली भूकंप झाले. यात दहा हजाराहून लोकांच्या मृत्यूची भीती आहे तर मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या इमारती
कराकससह अनेक भागांमध्ये इमारती आणि घरांचे नुकसान झाले आहे. स्थानिक माध्यमांनुसार, कराकस विमानतळाच्या छताचा काही भाग कोसळला. त्यामुळे धुराचा मोठा लोट उठलेला दिसला. हा गेल्या 126 वर्षांतील सर्वात मोठा भूकंप आहे, यापूर्वी 1900 मध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप आला होता. पहिला भूकंप 7.2 तीव्रतेचा होता. त्याचे केंद्र राजधानी कराकसपासून सुमारे 160 किमी पश्चिमेला जमिनीखाली 13 किमी होते. काही सेकंदांनंतर 7.5 तीव्रतेचा दुसरा भूकंप आला. त्याचे केंद्र मोरोन शहराच्या नैऋत्येला जमिनीखाली 10 किमी होते.


व्हेनेझुएलातील भूकंपाची कारणे
व्हेनेझुएला सर्वाधिक भूकंपाचा धोका असलेल्या प्रदेशात वसलेले आहे. येथे कॅरिबियन प्लेट आणि दक्षिण अमेरिकन प्लेट या दोन टेक्टॉनिक प्लेट्स आहेत. या दोन्ही प्लेट्स येथे एकमेकांना मिळतात.

यूएसजीएसनुसार, दोन भूकंपांपैकी दुसरा, अधिक शक्तिशाली भूकंप, या प्लेट्सच्या सीमेजवळील हालचालीमुळे झाला. प्लेट्समधील फॉल्ट लाईन्स, किंवा भेगा, आडव्या दिशेने सरकतात. जेव्हा ही हालचाल अचानक आणि वेगाने होते, तेव्हा भूकंप होतो. आणखी भूकंपाचे धक्के अपेक्षित आहेत, त्यापैकी काही खूप तीव्र असू शकतात.

पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हेनेझुएलामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. मोदींनी लिहिले की, या कठीण काळात भारत व्हेनेझुएलाच्या लोकांसोबत उभा आहे आणि गरज पडल्यास सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !