कजगावजवळ ट्रॅक्टरला आयशरची धडक : महिंदळेतील भाविक जागीच ठार


Eicher vehicle rams into tractor near Kajgaon ; devotee from Mahindale killed on the spot भडगाव (30 जून 2026) : पंढरपूर वारीसाठी निघालेल्या भाविकांना निरोप देण्यासाठी आलेल्या भाविकांच्या ट्रॅक्टरला भरधाव आयशरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात भडगाव तालुक्यातील महिंदळेतील 55 वर्षीय भाविक ठार झाला तर अन्य 15 भाविक जखमी झाले. हा अपघात कजगावजवळ मध्यरात्री घडली. दिनकर शेनपडू पाटील (55, महिंदळे, ता.भडगाव) असे मृत भाविकाचे नाव आहे.

अपघातात वाहनाचे झाले दोन तुकडे
अपघाताची घटना मंगळवारी मध्यरात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास घडली. आयशर वाहनाची धडक इतकी भीषण होती की, ट्रॅक्टरचे अक्षरशः दोन तुकडे झाले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.



ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णवाहिकांद्वारे चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. या अपघातामुळे महिंदळे गावावर शोककळा पसरली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !