चिंचोली विद्यालयासमोर ट्रकने दुचाकीला उडवल्याने तरुण जागीच ठार
Youth killed on the spot after a truck hit his two-wheeler in front of Chincholi Vidyalaya यावल (30 जून 2026) : यावल तालुक्यातील चिंचोली गावाजवळील सार्वजनिक विद्यालयासमोर श्री मनुदेवी फाट्याजवळ ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने चिंचोलीतील 37 वर्षीय तरुण दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला. अपघात प्रकरणी यावल पोलिसात ट्रक चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.
भरधाव ट्रकची दुचाकीला धडक
चिंचोली, ता.यावल या गावातून मार्गस्थ होणार्या अंकलेश्वर बर्हाणपूर राज्य मार्गावरील सार्वजनिक विद्यालयासमोर श्री क्षेत्र मनुदेवी फाटा आहे. या फाट्यावर दुचाकी (क्रमांक एम.एच. 19 ए. क्यू. 3166) घेऊन विजय राजेंद्र सपकाळे (37, रा.चिंचोली, ता.यावल) हा तरुण जात असताना त्याला भरधाव वेगात येणारा ट्रक (क्रमांक एम. पी. 09 एच.जी. 9565) वरील चालक शेख अन्सार शेख उमर (रा.कवटल, ता.संग्रामपूर, जि.बुलढाणा) यांनी धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार विजय सपकाळे हा जागीच ठार झाला.


अपघात प्रकरणी यावल पोलिसात ज्ञानेश्वर जगन्नाथ कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकवरील चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार वसंतराव बेलदार करीत आहे.
